Ad will apear here
Next
मिक्स व्हेज पराठा
....

दुधी भोपळा, गाजर, मुळा, बीट अशा भाज्या मुले सहसा खात नाहीत. खरे तर या फळभाज्यांपासून भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक घटक मिळतात. त्यामुळे यांच्या सरसकट भाज्या न करता वेगळ्या पद्धतीने या भाज्या मुलांच्या आहारात कशा आणता येतील हे पाहिले पाहिजे. यासाठीच आज पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी  या सदरात आपण पाहत आहोत, मिक्स व्हेज पराठा...
...................
दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत. म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा असे पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ही एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. सर्वांच्या आरोग्यासाठी ती उपयुक्त आहे. 
 
गाजरामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टिदोष होत नाही. तसेच मुळादेखील शरीरास उपयुक्त आहे. मुळा या पिकाचे जमिनीत वाढणारे मूळ आणि वरचा हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मुळा किसून किंवा पातळ चकत्या करून त्यावर मीठ घालून लिंबू पिळून खाल्ल्यास भूक वाढते. तसेच पचनशक्‍तीही वाढते. मुळ्यामध्ये असणाऱ्या सारक गुणधर्मामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्या व्यक्तींसाठी मुळा अतिशय उपयुक्त आहे. मुळ्याच्या हिरव्या पानांमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच काकडी हे भारतीय पीक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशातदेखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन घेतले जाते. अशा या गुणकारी फळभाज्यांपासून बनवलेला मिक्स व्हेज पराठा मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता त्याची रेसिपी पाहू या.

साहित्य :
गव्हाचे पीठ (कणीक), थोडेसे डाळीचे पीठ (बेसन), दुधी (साल काढलेला) – १,  गाजरे – २, काकड्या – २ ते ३, बीटरूट – १, मुळा – १, कोथिंबीर, तीळ, ओवा-जिरे पूड, तिखट, हळद आणि चवीपुरते मीठ. 

कृती : 
- सर्वप्रथम एका ताटात गरजेनुसार गव्हाचे पीठ घ्या.
- त्यात अगदी थोडेसे डाळीचे पीठ घालून ते एकत्र करून घ्या. 
- त्यामध्ये ओवा-जिरे पूड, तिखट, हळद, तीळ आणि गरजेनुसार मीठ घालून ते पुन्हा व्यवस्थित मिसळून घ्या.
- त्यानंतर साल काढलेला दुधी, गाजर, काकडी, बीट आणि मुळा हे सर्व बारीक किसणीने किसून घ्या. 
- त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला. 
- या सर्व किसलेल्या फळभाज्या एकत्रित केलेल्या पिठात घालून ते पुन्हा मिसळून घ्या. 
- गरज असल्यास त्यात थोडे पाणी घालू शकता. 
- हे एकत्र करून साधारण आपण पोळी करण्यासाठी कणीक मळतो, तशी ती आपल्या सोयीने मळून घ्या. 
- या उंड्याचे पराठे लाटून ते छान खरपूस भाजून घ्या. 
- गरम गरम खाल्ल्यास उत्तम. हे मिक्स व्हेज पराठे लोण्याबरोबर खाल्ल्यास आणखी लज्जतदार लागतात.

- डॉ. वृंदा कार्येकर 
ई-मेल : kvvrunda@gmail.com

(लेखिका पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ असून, होलिस्टिक हेल्थ कन्सल्टंट आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZINBF
Similar Posts
भाज्यांचे रोल्स विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. परंतु पोळीसोबत भाजी मुलांच्या गळी उतरवणं एक अवघड काम आहे. अशा वेळी या भाज्या मुले खातील याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याकडे आईचा कल असतो. अशाच एका विविध भाज्या असलेल्या पदार्थाची रेसिपी आपण या वेळी पाहणार आहोत.... तो पदार्थ म्हणजे भाज्यांचे रोल्स
स्टीम्ड पालक वडी भरपूर पौष्टिक घटक असलेल्या पालकाची भाजी मुले खात नाहीत. याचे पराठेही मुलांना फारसे आवडत नाहीत. म्हणून मग पालकाचा एक नवीन पदार्थ खास मुलांसाठी होऊ शकतो, जो ते आवडीने खातील. आज आपण पाहू या स्टीम्ड पालक वडीची रेसिपी
भाज्यांचा पौष्टिक खिमा आज पाहू या भाज्यांचा पौष्टिक खिमा...
डाळ-तांदळाचे घावन घावन हा तसा एक प्रचलित पदार्थ आहे. साधारणतः नाश्त्यासाठी हा पदार्थ केला जातो. आहारात डाळींचे महत्त्व आहेच. याच डाळींपासून बनवलेला हा पदार्थ मुलेही आवडीने खातील.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language